सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सर्वसामान्य समाज घटकापर्यंत वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात पोचवण्यासाठी व त्यांच्या जीवनात मदतीचा हात देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज नेहमीच अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मविप्रचे उपसभापती देवराम मोगल यांनी आज येथे केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन आणि देवळा एज्युकेशन सोसायटी देवळा यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २५) रोजी येथे आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपसभापती देवराम मोगल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.(Deola)
Deola | माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी स्वामी समर्थ केंद्रात स्वखर्चाने बसवले सीसीटीव्ही
या मोफत सर्वरोग प्रसंगी चिटणीस दिलीप दळवी, शालनताई सोनवणे, प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर,सतिश बच्छाव, डॉ. सयाजीराव गायकवाड, विजय पगार संस्थेचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, रोटरी क्लबचे अध्यक्ष एसटी पाटील आदींसह सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष एस टी पाटील यांनी केले. निमंत्रक मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, विजय पगार यांनी शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तर चिटणीस दिलीप दळवी, डॉ.विश्राम निकम, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी आपल्या मनोगतातून शिबिराचे महत्त्व, संस्थेचे कार्य स्पष्ट करून शुभेच्छा दिल्या.(Deola)
Deola | देवळा येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
या वेळी साधारण २२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर त्या पैकी ५५ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. इतरांना वैद्यकीय सल्ला देत मोफत औषधे वितरित करण्यात आली. तालुक्यातील अनेक ज्येष्ठ सभासद व इतर घटकांनी याचा लाभ घेतला. समारोप प्रसंगी उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी आणि सेवक यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पंडितराव निकम, सुनिल आहेर, पुंडलिक आहेर यांसह सभासद तसेच रोटरी सदस्य सुनिल देवरे, अरुण पवार, खंडू मोरे, दिनेश सोनार, अब्रार मणियार, कैलास बागुल आणि मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक वर्गासह तालुक्यातील अनेक रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.टी.पगार यांनी केले तर आभार संचालक विजय पगार यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रवीण वाघ व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम