Beed Crime | शाळेत शिक्षिकांचे अश्लील कृत्य, घटनेमुळे विद्यार्थी हादरले

0
46
Beed Crime
Beed Crime

Beed Crime |  राज्यात सध्या अनेक ठिकाणी गुरु-शिश्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, अशाच एका घटनेमुळे बीड जिल्हा (Beed Crime) हा हादरला आहे. येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडमधील एका शाळेच्या आवारातच दोन शिक्षक हे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून यावरुन मोठा संताप व्यक्त केला आहे. तसेच, संबंधित शाळेच्या व्यवस्थापनानेही या घटनेवर तीव्र आक्षेप घेतलेला आहे.

दरम्यान, संबंधित शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे एक पुरुष आणि एक महिला शिक्षक यांनी परीक्षा विभाग तसेच शाळेच्या इतर आवारातही अश्लील कृत्य केलं असून, याचा एक व्हिडिओ देखील शूट केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. दरम्यान, हे व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले होते, असं ह्या तक्रारीत सांगितलेलं आहे.

ह्याच संबंधित शैक्षणिक संस्थेत काम करणार्‍या शिपायाने शाळेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबद्दलची माहिती दिली होती. मात्र, तोपर्यंत ह्या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाले होते. ह्या कथित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी (दि. ९ डिसेंबर) शनिवार रोजी शिक्षकावर तसेच त्याच्या सोबत असलेल्या इतरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Cafe Raid | कॅफे बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे; पोलिसांची धडक कारवाई

मुख्यध्यापकांच्या तक्रारीनुसार, बीड पोलिसांनी एका पुरुष शिक्षकाच्या विरुद्ध अनेक कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान, ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला शिक्षक हा फरार आहे, तो मूळचा पुण्याचा असून,  त्याच्या मालकीचे चारही मोबाइल हे बंद आहेत. बीड पोलिसांनी त्यांचे विशेष शोध पथक हे पुण्याला पाठवलेले असून, या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.

ह्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच शिक्षकांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात आलेली असल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे. एका अधिकृत तपशीलानुसार, ह्या शाळेत २३ महिला तसेच ३६ पुरुष असा स्टाफ या शाळेत कार्यरत आहे. दरम्यान, तब्बल ७० वर्षे जुन्या ह्या शैक्षणिक संस्थेच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तींचा पर्दाफाश करण्यासाठी ह्या शाळेचे व्यवस्थापन हे बीड पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे.

धक्कादायक! तरुणाला घरी बोलवून नग्न नाचवलं; अश्लील व्हिडिओ शूट करुन केला व्हायरल

ह्या शाळा व्यवस्थापनाने या गंभीर घटने प्रकरणी तब्बल चार शिक्षकांना निलंबित केलेले आहे. ह्या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दोन शिक्षकांसह इतर दोन महिला शिक्षिकांचीही त्या आरोपी पुरुष शिक्षकाशी जवळीक असल्याचं सांगण्यात येत असल्याने इतर दोन महिला शिक्षकांनीही स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे.असेही सांगण्यात येत आहे की, हे व्हिडिओ जुने असून, वैयक्तिक शत्रुत्वातून जाणूनबुजून ते आता प्रसारित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here