Winter Session | विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session)हे आजपासून नागपूरमध्ये सुरु झालेलं आहे. या अधिवेशन काळात विविध मुद्दे चर्चेत येत आहेत. दरम्यान, आता असाच एक साडे तीन वर्ष जुना मुद्दा ह्या अधिवेशनात पुन्हा चर्चेत आलेला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलं आहे.
दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिचं मृत्यू प्रकरण हे पुन्हा चर्चेत आलं आहे. या प्रकरणाची आता SIT चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही SIT चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणावरून पुन्हा हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी देखील यावेळी करण्यात आली.(Winter Session)
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशी होईल की नाही होईल, याचा निर्णय राज्य सरकार घेईल. पण दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणामुळे हा संशय निर्माण झालेला आहे, तो स्पष्ट होण्याची गरज आहे. वातावरण साफ आणि स्पष्ट हे झालंच पाहिजे.(Winter Session)
Winter Update | मालेगावचे तापमान राज्यात नीचांकी; जिल्हाभरात थंडीचा जोर वाढला
लोकांच्या मनातील उत्तरं ही मिळालीच पाहिजेत. ज्या पद्धतीचे पुरावे आहे. त्याबद्दलचे स्पष्टीकरणही पोलीस खात्याकडून मिळाली पाहिजेच. मी तर म्हणेल की, आदित्यजींनी स्वतःच ह्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली पाहिजे. स्वतःच त्या कमिटी समोर गेले पाहिजे, अशी सूचना वजा विनंती मी करेन, असं यावेळी आशिष शेलार हे म्हणाले.(Winter Session)
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात लागलेल्या ह्या एसआयटी चौकशीचे मी स्वागत करतो. लोकांच्या मनात मोठा संशय होता. या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे का? असा संशय लोकांच्या मनात होता. तो संशय आता नक्कीच दूर होईल. आदित्य ठाकरे हे जागतिक स्तरावर लोकप्रिय नेते आहेत. इकडे अधिवेशन चालू असताना सध्या परदेशात आहेत. त्यांना सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नाही, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.(Winter Session)
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मला वाटते की, आदित्य ठाकरे यांचाच हात आहे. राज्याच्या गृहखात्याकडे तसे काही पुरावेदेखील आलेले आहेत, असं संजय शिरसाठ हे यावेळी म्हणाले. तर राज्य सरकारकडून सूडबुद्धीने याप्रकरणी कारवाई केली जात असल्याची टीका, विनायक राऊत यांनी केली होती. त्यावर “तुमच्यावर सुड उगवण्यासाठी हे सरकार स्थापन झालेलं नाहीये. संजय राऊत यांची सावलीच विनायक राऊत यांच्यावर पडली आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राउतांना प्रत्युत्तर दिलंय.(Winter Session)
Winter session | शिंदेंचे आमदार नाराज; त्यांच्याच बड्या मंत्र्यांची केली तक्रार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम