Job Alert | ’10’ वी पास उमेदवारांनाही भारतीय नौदलात नोकरीची संधी!

0
25

Job Alert | दहावीनंतर तुमच्यासाठी करिअरचे कोण-कोणते पर्याय खुले आहेत? असे विचारलं गेलं तर तुमचं उत्तर काय असेल? तुम्हाला वाटत असेल की दहावीनंतर बारावी करून कुठल्यातरी मोठ्या कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल मात्र आता तसं नाही. 10वी नंतर करिअरचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध झालेले आहेत. (Job Alert)

असाच एक पर्याय म्हणजे ‘Indian Navy’. ज्या लोकांना 10वी नंतर इंडियन नेव्हीमध्ये करिअर सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे. 10 वी पास उमेदवारांची भरती ‘इंडियन नेव्ही एमआर’ या पदावर केली जात असते. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असावा लागतो. या पदावर नोकरी मिळविण्यासाठी, निवड प्रक्रियेमध्ये CBT, शारीरिक फिटनेस चाचणी, वैद्यकीय परीक्षा यां प्रक्रियांचा समावेश होतो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर  शेफ, steward, hygienist या पदांवर काम करण्याची संधी मिळते. (Job Alert)

Crime News | बॉयफ्रेंडची शुल्लक चूक; गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई

वर्षातून दोनदा, भारतीय नौदल MR (मॅट्रिक भर्ती) जून/जुलै आणि नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज घेत असून भारतीय नौदल 10 वी नंतर 3 रोजगार श्रेणी ऑफर करते.

शेफ एमआर (Chef MR) : या पदावर काम करणारी व्यक्ती मेनूमध्ये दिलेले अन्न (शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसह) तयार करेल तसेच रेशनची काळजी घेण्याचं काम करेल.

स्टीवर्ड एमआर (Steward MR) : या पदावर काम करणाऱ्या लोकांना वेटरिंग, हाउसकीपिंग, पैशांचा हिशेब, वाईन आणि इतर गोष्टींची काळजी घेणे, अधिकाऱ्यांच्या मेस सुविधांमध्ये मेनू तयार करणे इत्यादी कामे करावी लागतात. firearms training ही दिले जाईल.

हायजिनिस्ट एमआर (Hygienist MR) : शौचालय आणि इतर ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी दिली जाईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला firearms training देखील दिले जाणार आहे.

Michaung Cyclone | ‘मिचॉंग’ चक्रीवादळ माजवणार कहर; 118 रेल्वेगाड्या रद्द

  • भारतीय नौदलाच्या भरती नियमांनुसार, स्टीवर्ड, शेफ आणि सॅनिटरी हायजिनिस्ट या पदांसाठी उमेदवारांचे वय नावनोंदणीच्या दिवशी 17 ते 20 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या पदांच्या भरतीसाठी Computer-Based Test (CBT), फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT), मेडिकल एग्जाम असेल. CBT हा 100 गुणांचा पेपर असणार आहे. या परीक्षेच्या पेपरमध्ये चार विभाग असताल तसेच प्रत्येकी 25 प्रश्न असतील. यात करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, जनरल सायन्स, मॅथ्स या विषयांचे प्रश्न असतील.
  • तुम्ही www.joinindiannavy.gov.in वरून अभ्यासक्रम आणि इतर माहिती मिळवू शकतात.
  • फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये 1.6 किमी धावणे 7 मिनिटांत पूर्ण करावे लागणार आहे. 20 स्क्वॅट अप आणि 10 पुश-अप करावे लागतील.
  • मेडिकल एग्जाममध्ये उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासले जाणार आहे.

तीनही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान 14,600 रुपये स्टायपेंड मिळेल. प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना लेव्हल 3 डिफेंसवर मॅट्रिक्स दिले जाईल. यामध्ये 21,700 ते 69,100 पर्यंत पगार आहे. (Job Alert)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here