OnePlus चा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 येत्या 5 डिसेंबरला चीनमध्ये लाँच होणार आहे. आता फोन लॉंच होण्यासाठी फक्त 8 दिवस उरले असताना कंपनी फोनच्या टीजरमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करत आहे. मात्र अधिकृतपणे फोनची डिजाइन समोर आलेली नव्हती ती आता Oppo मॉलच्या एका ओव्हरलेड बॅनर फोटोमधून समोर आलेली आहे. त्यामुळे OnePlus 12 च्या रियर डिजाइनसह कलर व्हेरिएंटची माहिती देखील मिळालेली आहे.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
OnePlus 12 ची डिजाइन
OnePlus 12 ची डिजाइन बऱ्याच अंशी OnePlus 11 सारखी दिसत आहे. रियर पॅनलमध्ये एक सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात 3 कॅमेरे आहेत, चौथ्या सर्कलमध्ये काही सेन्सर आहेत आणि हॅसलब्लेड ब्रँडिंगसाठी एक ‘एच’ लोगो आहे. एलईडी फ्लॅश यूनिट सर्कुलर कॅमेरा मॉड्यूलच्या बाहेर आहेत. तर बॅनर फोटोवरून समजलं आहे की क्लासिक ब्लॅक, प्रिस्टिन व्हाइट आणि व्हायब्रँट ग्रीन अशा तीन 3 कलर्स मध्ये उपलब्ध होईल. फोनच्या आधीच्या फोटोवरून समजलं आहे की ह्यात कर्व्ड-एज ओएलईडी डिस्प्ले असणार आहे.
Nashik news | नुकसानग्रस्त शेतक-यांनी ७२ तासांच्या आत कृषी विभागास संपर्क साधावा
OnePlus 12 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स काय?
OnePlus 12 मध्ये 6.82 इंचाचा BOE X1 OLED डिस्प्ले दिली जाईल, ज्याचा रिजोल्यूशन 2के, रिफ्रेश रेट 120हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस 3000 निट्स आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित कलरओएस 14 वर चालेल. या स्मार्टफोनमध्ये 5400 mAh ची बॅटरी दिली जाईल जी 100 वॉट वायर्ड आणि 50 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
स्मार्टफोनच्या मागे OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ३एक्स ऑप्टिकल झूमसह 64 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल. तर फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 वर चालेल. वनप्लस 12 मध्ये 16 जीबी पर्यंत एलपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि 1 टीबी पर्यंत यूएफएस4.0स्टोरेज दिली जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम