धक्कादायक! जेवण दिलं नाही म्हणुन मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळलं

0
19

Crime News | किरकोळ वादातून मुलानेच आईला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही घटना आलिबागमधील सुडकोली येथे घडलेली आहे. ‘चांगुणा रामदेव खोत’ असं या मृत आईचे नाव आहे.  तर मुलाचं नाव ‘जयेश रामदेव खोत’ (वय२७) असं आहे. जयेश रामदेव खोत याचे त्याच्या आईशी जेवणावरून वाद झालेले होते. त्यावरूनच संतापलेल्या जयेशने आईवर दांडक्याने हल्ला केला. त्यानंतर धारदार कोयत्याने त्याने आईला जखमी केलं, त्यानंतर तीला मोकळ्या जागेत नेत तिच्यावर पालापाचोळा टाकत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे.

Kojagiri 2023 | कावडधारी निघाले भगवतीच्या दर्शनाला…

या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी जयेशला देखील ताब्यात घेतलं आहे. चांगुणा खोत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जातो आहे. जन्मदात्या आईचा जीव घेणाऱ्या मुलामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

Nashik | मेथीच्या जुडीला सोन्याचा भाव; सणासुदिला गृहिणींचं बजेट कोसळणार 

नेमकं घडलं काय ?

मंगळवारी रात्री मुलामध्ये आणि आईमध्ये जेवण दिलं नाही म्हणून किरकोळ वाद झाला होता. शाब्दिक चकमकदेखील झाली. त्यानंतर रागाच्या भरात जयेशने लाकडी दांडक्याने आईला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याने आईला घराबाहेर अंगणात आणलं. आईला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला जिवंत जाळलं. या संपुर्ण घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चांगुणा खोत यांना अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पुढिल आधिक तपास पोलिस करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here