CM Shinde | आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे. आझाद मैदानावर शिवसैनिकाच्या गर्दीत वाढ झालेली आहे. आझाद मैदानात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली.
Dasara Melava| शिवतीर्थावर साक्षात बाळासाहेब अवतरतात तेव्हा..
मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर साधला निशाणा
ठाकरे समाजवादी लोकांशी युती करत आहेत. साहेबांनी ज्यांना नाकारले त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात. महागद्दार कोण हे जनता चांगलं जाणते. शिवसैनिक जगला काय.. मेला काय त्यांचं यांना काही नाही.. फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढच यांना माहीत.आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले आहेत. रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीचं बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ आहेत अशी जहरी टिका देखील त्यांनी केली आहे. ठाकरे कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांचा डोळा पैशांवर आहे. शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी रुपयांसाठी उद्धव ठाकरेंनी पत्र पाठवलं. आम्हाला खोके म्हणता पण यांना फक्त कंटेनर हवेत कंटेनर, खोके नकोत असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
LIC: LIC ची अप्रतिम योजना, फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा
‘चेहरे के पिछे कई चेहरे लगा लाते है लोग..’ म्हणून सीतेचे हरण करण्यासाठी जसे रावणाने साधूचे रूप धारण केले तसेच मुख्यमंत्री बनण्यासाठी यांनी संतसाधुचे रूप घेतले. पवारांकडे दोन माणसं पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा असं त्यांना सांगितलं. 2004 सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देणारच असा विश्वास देखील वर्तवलेला आहे. आजच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देणारच असं ठाम मत यावेळी मांडलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम