Virat Kohli | क्रिकेटमध्ये विक्रमांवर विक्रम रचत असलेल्या किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीनं आज पुण्यातील मैदानात पुन्हा एकदा आपल्याला चेस मास्टर का म्हणतात हा सिद्ध केले. ODI WORLDCUP 2023 मधील बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात काल किंग विराट कोहलीने दमदार नाबाद शतकी खेळी करत टीम इंडियाला चौथा विजय मिळवून दिला. या विजयाचा शिल्पकार पूर्णतः विराट कोहली ठरला.
Nashik | नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विराट मोर्चा; जाणुन घ्या कसा असेल मार्ग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी किंग विराट कोहलीला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीमधील 48 व्या शतकाची नोंद केली आहे. सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांचा विक्रम पार करण्यासाठी आता त्याला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. त्यामुळे शतकांची फिफ्टी होण्यासाठी अवघ्या दोन शतकांची गरज विराटला असून ते स्वप्न या वर्ल्डकपमध्येच पूर्ण होईल यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही.
crime news | 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं
विराट कोहलीने या शतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 26000 धावांचा टप्पा डावांच्या तुलनेत सर्वात वेगाने पार केला आहे. विराट कोहलीच्या पुढे लिस्टमध्ये फक्त आता सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पॉंटिंग हे तीनच खेळाडू आहेत. कोहलीची फिटनेस आणि फॉर्म पाहता तो निश्चितच दुसऱ्या क्रमांकापर्यंत जाऊन पोहोचेल यामध्ये तिळमात्र शंका नाही.
वर्ल्डकपमधील हे विराटचे तब्बल आठ वर्षांनी शतक आले. चेस करताना वर्ल्डकपमधील सुद्धा कालचं त्याचं पहिलं शतक ठरलं. यापूर्वी 2011 मध्ये सुद्धा वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरोधात कोहलीने शतकी खेळी खेळली होती आणि काल तब्बल बारा वर्षांनी बांगलादेशविरुद्ध त्याने शतकी खेळी करत बांगलादेशला हरवले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम