Nashik | ‘सरकार जर का म्हणत असेल एक कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करत असतात मग सरकारने हाही विचार करावा की, एका आमदाराच्या पगारावर किती कला, क्रीडा, संगणक शिक्षक काम करू शकतील? असा सवाल आंदोलक शिक्षकांनी उपस्थित केलेला आहे. याशिवाय शासन वेळोवेळी आम्हा शिक्षकांची दिशाभूल करते. आमच्यासारख्या हातावरच्या शिक्षकांनी कस जगायचं? आम्ही संसार कसा चालवायचा? असं सांगत आंदोलक शिक्षकांनी आपल्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे.
नाशिकमधील ईदगाह मैदानावर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील आदिवासी विभागातील कंत्राटी कला, क्रीडा, संगणक शिक्षक कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कला, क्रीडा, संगणक शिक्षक मानधन या तत्वावर काम करत आहेत. पण आता शासनाकडुन खासगी कंपनीच्या माध्यमातून पदं भरली जाणार असल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झालेली असून शासनाने याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केलेली आहे. कला, क्रीडा, संगणक शिक्षकांची आजही आदिवासी विभागात अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शाळेवर अनुपस्थिती असल्याने ‘सर तुम्ही केव्हा येणार’ असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातो.
TATA, Mahindra, Hyundai सोबतच 5 नवीन SUV लवकरच होणार लाँच
साधारण 2018 पासून आम्ही आदिवासी विभागातील कला, क्रीडा आणि संगणक विभाग शिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करतो आहे. पण आताच्या स्थितीत शासनाच्या माध्यमातून कंपनीला टेंडर देऊन त्या कंपनीच्या माध्यमातून ही पदं भरण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. आंदोलक शिक्षकांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. गेल्या महिन्यात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी देखील आश्वासन दिलेलं होतं की, तुमचा विषय हा न्यायालयीन प्रविष्ट असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी सांगितलेले होते. पण दुसरीकडे शासनाच्या GR नुसार कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांची पदं मंजूर होत नाहीत. याच कारणांमुळे येथील आंदोलक शिक्षक म्हणाले की यात आमची चूक काय? न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असल्यामुळे आम्ही काही दिवसात यावर तोडगा काढू असा निर्णय शासनाकडून देण्यात आलेला होता परंतु यावर अद्याप कोणतीही भूमिका शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नसल्याचं आंदोलक शिक्षकांनी सांगितलेले आहे.
Big News | एका मिनटात स्मशानभूमीत झाला शुकशुकाट; लोक मृतदेह सोडून पळाले
या आहेत प्रमुख मागण्या…
संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेमधील कंत्राटी क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांना सेवासातत्य आणि संरक्षण मिळावे.
विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या अंतिम याचिकांच्या निकालाच्या अधिन राहून नियुक्ती आदेश त्वरीत मिळावे.
बाह्यस्त्रोताद्वारे होणारी भरती प्रकिया पुर्णपणे थांबवण्यात यावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकच्या नियुक्ती आदेशात एकत्रितपणा असणे आवश्यक आहे.
क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तोंडावर येऊन ठेपल्या असताना सदर शिक्षकांच्या नियुक्ती अभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि सर्वांगीण विकासावर होत आहे. याचा शासनाकडून गांभीर्याने विचार व्हावा.
शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षणाच्या हक्काशिवाय आदिवासी विद्यार्थी हा आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहत असुन त्यांचे मुलभुत अधिकार हिरावून घेतले जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम