IND vs AFG | थोड्याच वेळात अफगाणविरोधात भारताचा सामना; गिलच्या जागी ईशान निश्चित

0
10

IND vs AFG | भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया टिमचा पराभव करणाऱ्या भारतीय टिमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यामुळे अफगाणिस्तानविरोधात भारतीय संघाचे पारडं जड मानलं जात आहे. भारतीय फलंदाज शुभमन गिल अजुनही आजारातून बरा झालेला नाही यामुळे त्याची कमी भारतीय संघाला नक्कीच जाणवेल असं चित्र दिसतंय. आजच्या प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना रोहित शर्माने प्लेईंग 11 संदर्भात हिंट दिलेली होती.  भारतीय संघाचे 10 शिलेदार ठरलेले आहेत. एका जागेसाठी 3 खेळांडूमध्ये चुरस लागलेली आहे.

Nashik | नाशकात दुधाचा मोठा साठा केला जप्त; गायीच्या दुधातदेखील भेसळ सुरु

आघाडीच्या फळीमध्ये कोण कोण ?

कॅप्टन रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला येणार आहेत. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झालेले होते. मात्र आजच्या सामन्यात इशान किशनला स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात येईल. दिल्लीच्या खेळपट्टीवर रन्सचा पाऊस पडणार आहे. दक्षिण आफ्रिका टिमने येथे झालेल्या पहिल्या मॅचमध्ये रन्सचा पाऊस पाडला होता. त्यामुळे या मैदानावर भारतीय फलंदाजी जोरदार चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्मा-ईशान किशन हे सामन्याची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीची जबाबदारी संभाळणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीत सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात येणार आहे.  के.एल. राहुल याने विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून उजवी कामगिरी केलेली आहे. कांगारुविरोधात के.एल. राहुलने नाबाद 97 धावांची खेळी खेळली होती. यामुळे या सर्व खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असेल.

Israel | इस्त्राईलमध्ये युद्धसंग्राम..भारतावर काय होणार परिणाम?

गोलंदाजीत कोण कोण खेळणार ?

कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांची जागा निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र एका स्थानासाठी पेच पडताना दिसत आहे. अश्विन, शार्दूल आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार आहे ? याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. दिल्लीचे मैदान छोटे असल्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कदाचित मोहम्मद शामी आणि शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एका गोलंदाजाची निवड होऊ शकते. शार्दूल ठाकूर शेवटी फलंदाजी करु शकतो त्यामुळे त्याचा नावाचा जास्त विचार केला जाऊ शकतो. पण मोहम्मद शामीने आतापर्यंत दमदार कामगिरी केलेली आहे. विश्वचषकात सर्वात जास्त  विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शामी आघाडीवर आहे. 2019 च्या विश्वचषकात शामी याने हॅट्ट्रीक विकेट घेतली होती. त्यामुळे मोहम्मद शामीला संधी दिली जाणार का? दिल्लीच्या खेळपट्टीवर शामी प्रभावी खेळु शकतो. पण भारतीय टिम अफगाणिस्तानला हलक्यात घेणार नाही.

अफगाणिस्तानविरोधात भारताचे खेळणारे 11 शिलेदार कोण?

रोहित शर्मा (कर्णधार)

ईशान किशान

विराट कोहली

श्रेयस अय्यर

केएल राहुल (विकेटकीपर)

हार्दिक पांड्या (उप कर्णधार)

रविंद्र जाडेजा

कुलदीप यादव

शार्दूल ठाकूर/मोहम्मद शामी

मोहम्मद सिराज

जसप्रीत बुमराह.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here