Citi link strike : उद्यापासून सिटीलिंक कर्मचारी पुकारणार काम बंद आंदोलन

0
21

(Citi link strike) नाशिक शहराची वाहतूक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटी लिंक बसचे कर्मचारी उद्यापासून काम बंद आंदोलन पुकारत आहेत.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सर्वसामान्य चाकरमान्यांची वाहतूक वाहिनी म्हणून सिटी लिंक बसेसला ओळखले जात आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी सिटी लिंक मार्फत अत्यंत कमी दरात वाहतूक व्यवस्था नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अत्यंत कमी पैशांमध्ये सुखकर करणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत असल्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांकडून उद्यापासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. थकीत वेतन ताबडतोब अदा करण्यात यावे या प्रमुख मागणी सह विविध मागण्यांकरिता उद्या सकाळपासूनच हे आंदोलन पुकारण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वीच सिटीलींकच्या कर्मचाऱ्यांकडून थकीत वेतन अदा करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी देखील सर्वसामान्य नागरिकांची अचानकपणे पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे गैरसोय झाली होती. मागील वेळी कोणतीही सूचना न देता हे कर्मचारी आंदोलनावर गेल्यामुळे सिटी लिंक बसेस वर अवलंबून असलेल्या सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र यावेळी कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती आधीच देण्यात आली आहे. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याने नागरिकांनी आपल्या येण्या जाण्यासाठी योग्य त्या पर्यायी उपाय योजना कराव्यात अस आवाहन सिटी लिंक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल आहे.

यापूर्वी देखील सिटी लिंक कंपनीचा कारभार कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वादात आला होता, आत्ताही पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली असल्याने शहरातील बससेवा कोलमडली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील बस सेवा ठप्प झाल्याने शहरातील वाहतुक व्यवस्था विस्कळीत होणार असल्याने महापालिका यामध्ये हस्तक्षेप करून आंदोलना आधीच तोडगा काढणार का ? की या कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here