(Kirit somayya) : भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा एक खळबळ जनक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या हे आक्षेपार्ह स्थितीमध्ये दिसून आल्याने एखाद्या राजकीय ज्येष्ठ नेत्याचे खाजगी व्हिडिओ व्हायरल होत असतील तर जनसामान्यांच्या सुरक्षेच काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे नेहमीच या न त्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीका नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतात. मात्र आता याच किरीट सोमय्या यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत.
राजकीय महिला पदाधिकाऱ्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…
यात राष्ट्रवादीच्या दिपाली चव्हाण यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोडे उडवणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहेत. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतील तर त्यांना दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार काय? असा प्रश्न देखील विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे तपासून कारवाई करणं गरजेचं आहे एखाद्या लोकप्रतिनिधीचे अशा पद्धतीने व्हिडिओ समोर येणं हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक असून किरीट सोमय्या हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांनी राज्यातील अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत त्यांचेच अशा पद्धतीचे व्हिडिओ येत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत असल्याचं सांग या व्हिडिओची शहानिशा करून कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी देखील नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची आता पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असा आव्हान भाजपला केल आहे. तर अनेकांचे सार्वजनिक आयुष्य खोट्या नाट्य आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतः आपल्या या कृत्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेटी बचाव, बेटी पढाव म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळे बेटी को भाजपा से बचाव असं म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे अशी टीका केली आहे.
जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे तेव्हापासून महाराष्ट्राला कंलक लागल्याचे पाप सुरु झाल आहे. आज एक व्हिडिओ आम्ही पाहिला. दुसऱ्याचे वस्त्रहरण करता करता स्वत:चे वस्त्रहरण झाले अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी देखील ट्विट करत या व्हिडिओ प्रकरणी आपलं मत व्यक्त केल आहे. एकीकडे त्यांचा पक्ष ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या गप्पा मारतो दुसरीकडे त्यांचे नेते नेहमीच अनैतिक वर्तन करताना आढळतात. त्यांची ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही घोषणा काही खरी नसून ‘बेटीयों को भाजपा नेताओं से बचाओ’ आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. आता आपल्याच एकावर कारवाई होणार की नाही? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. तर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका देखील केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी केली जावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केल्याने पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम