देवळा बाजार समिती निवडणुकीत विक्रमी अर्ज; नानांच्या ‘होम मिनिस्टर’ मैदानात चुरस वाढणार

0
17
देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना भाऊसाहेब पगार समवेत माजी सभापती केदा आहेर ,सभासद बी डी रौदळ आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवारी (दि ३) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण १४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची बुधवार (दि ५) रोजी छाननी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निंबंधक सुजय पोटे यांनी दिली.

देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना भाऊसाहेब पगार समवेत माजी सभापती केदा आहेर सभासद बी डी रौदळ आदी छाया सोमनाथ जगताप

या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण अठरा जागांसाठी सोमवारी (दि २७) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी दि ३ रोजी शेवटची मुदत होती. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आजी माजी सभापती ,संचालक व नवीन चेहर्यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध होणार कि ,चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले असून ,खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .

नानांच्या होम मिनिस्टर मैदानात
माजी जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. नानांच्या ‘होम मिनिस्टर’ मैदानात उतरणार असल्याने नाना समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. नाना समर्थकांना मेहनत घ्यावी लागणार मात्र एकंदरीत कार्यकर्त्यांचे जाळे बघता निवडणुक कुणाला फायद्याची हे माघारी नंतर समजेलच मात्र नाना आपले पत्ते ओपन करत बिनविरोध निवडणुक करून आणणार की मैदानात लढून जिंकणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. यावेळी विक्रमी अर्ज दाखल झाले असून पॅनलचे नेतृत्व कोण करते याकडे देखील लक्ष असणार आहे.

पत्रकार वैभव पवार मैदानात
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वैभव धर्मा पवार यांनी विक्रमी मतदान घेत थेट सरपंचपदी मजल मारली होती. पवार यांच्या दांडग्या जन संपर्कामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांनी थेट सहकार विभागात दंड थोपटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवार हे पत्रकार असल्याने निःपक्ष म्हणून अपक्ष राहता की पॅनलमध्ये डेरा टाकता याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांची लोकप्रियता बघता कुठल्याही पॅनल साठी ते फायद्याचेच ठरणार असल्याने नेमक कुणाचं नेतृत्व मान्य करता हे बघणे महत्वाचे असेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here