‘नाना’ – ‘आबा’ वज्रमूठ दाखवणार की सत्ता वाटून घेणार ? ; देवळा बाजार समिती निवडणूकीत विक्रमी अर्ज

0
3

देवळा: देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे रणशिंग फुंकले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले. यात दोन पॅनल होता की नेते एकमेकांमध्ये समजोता करत निवडणुक बिनविरोध पार पाडता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. योगेश आबा यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीने आबा यांचा कार्यकर्ता दुरावत असल्याचे चित्र त्यांनाही नाकारता येणार नाही.

तालुक्यात भाजपचे एकहाती वर्चस्व असल्याने नानांच्या विरोधात विरोधक एकत्र येत पॅनल निर्मिती होणार की, नाना – आबा यांच्यात मनोमिलन होत एकमेकांच्या कार्यकर्त्यांना संधी देत सत्ता वाटून घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. मात्र नानांच्या तालुक्यातील नेतृत्वामुळे सध्याच्या घडीला इतर नेत्यांचे कर्तृत्व मात्र दाबले जातेय. इतर नेत्यांचे संघटन खिळखिळे झाले, असून या निवडणूकीत नानांच्या विरोधात विरोधकांची एकजूट नाही झाली, अन् बेकी झाली. तर भविष्यात तालुक्यात नामधारी नेते असतील हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

नाना – दादा जोडगोळीला थोपवणे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. नानांन इतका जनाधार योगेश आबा यांच्याकडे देखील आहे. मात्र त्यासाठी आबांनी आपली ‘वज्रमूठ’ आवळून ती या निवडणुकीत दाखविण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या मैदानात होईल ते होईल मात्र लढणे महत्वाचे आहे. आपला नेता लढला हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाने महत्त्वाचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी बाजारसमिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी जगदीश पवार, पंडित निकम, संतोष (गोटु) शिंदे, दिलीप आहेर यांच्यासह आदी. पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत उमेदवारी अर्ज दाखल केले.

देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवारी (दि ३) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण १४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची बुधवार (दि ५) रोजी छाननी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निंबंधक सुजय पोटे यांनी दिली .

या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण अठरा जागांसाठी सोमवारी (दि २७) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी दि ३ रोजी शेवटची मुदत होती. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आजी माजी सभापती ,संचालक व नवीन चेहर्यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध होणार कि , चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले असून , खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here