दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अमित शहाबरोबरच्या भेटीवर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीत गलेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांनतर मोठी खळबळ उडाली व खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, त्यावर त्यांची सून व खासदार रक्षा खडसे यांनी अधिक माहिती देत आपण एकनाथ खडसे यांच्यासोबत दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेलो होतो. पण, अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र शहांनी खडसे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे.
दरम्यान ह्या माहितीनंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया दिली. पण त्यांनी आपले शहांसोबत फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य करत आपले भाजपा नेत्यांसोबत चांगले जवळचे संबंध असल्याची कबुलीही दिली आहे. तसेच ते हेही म्हणाले, आपण याआधीही भाजपच्या नेत्यांना भेटलो, पुढेही भेटत राहू. पण मी राष्ट्रवादीमध्ये असणार आहे, पक्ष सोडून जाण्याचा माझा अजिबातच विचार नाही. आणि समजा जर आमची भेट झाली, तर मी शरद पवारांना विचारूनच शहांना भेटायला जाईन, असे ते म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम