अवकाळी पावसाने भाजीपाल्यांचे वाढले दर, सामान्य नागरिकाच्या खिशाला मात्र झळ…

0
2

द पॉईंट नाऊ: पंचवटी,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला गुरुवारी शेकडा १६ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शहरासह जिल्हाभर चर्चेला विषय ठरला. अवकाळी मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोथिंबीरच्या जुडीला १६० रुपये दर मिळाला. कोथिंबीरसह सर्वच भाज्यांचे दर वाढल्याने याची सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे.

“नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लिलावात कोथिंबिरीला शेकडा १६ हजार रुपये असा दर मिळाला. जिल्ह्यातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र यंदा यंदा याउलट चित्र आहे. अतिवृष्टीमुळे पालेभाज्या शेतातच सडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांचा दर्जाही खालावला असून दूरवरच्या मार्केटमध्ये जाईपर्यंत पालेभाज्या टिकू शकत नाहीत. एकूणच स्थिती पाहता पालेभाज्यांची आवक कमी असल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे दिसते.

मात्र या वाढलेल्या भाज्यांचा दरांचा सर्वसामान्यांना आर्थिक झटका बसला आहे. पावसाच्या पाण्यावर निचरा होणाऱ्या जमिनीत पालेभाज्यांची पिके घेण्यात येतात. गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नवरात्रोत्सव या काळात पालेभाज्यांना मागणी असल्यामुळे यावेळी बाजारात येऊ शकतील अशा रितीने पालेभाज्यांची लागवड केली जाते नेमक याचवेळी बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक पालेभाज्यांची पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जी काही थोडी पिके वाचली त्यांचा दर्जा ही अति पाण्यात वाढल्याने घालवला आहे. अशा भाज्या टिकत नाही त्यामुळे त्यांना हवा तसा दर मिळतही नाही.

नाशिक येथील बाजारात लिलावासाठी सध्या दिंडोरी, कळवण, निफाड या तालुक्यातून पालेभाज्या येतात. सिन्नर परिसरातून दरवर्षी पालेभाज्यांची आवक होत असते. मात्र, या भागात अतिपाऊस झाल्याने तेथील आवक घटली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पालेभाज्यांची काढणी करणे सोयीचे होत असल्याने येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा आवक घटू शकते. यामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा वाढलेल्या भाजीपाल्याच्या किंमती मुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here