नाशिक – शहर व जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत दुचाकीचोराला मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोराच्या ताब्यातील सहा दुचाकी हस्तगत केल्या आहे.
मूळ दिल्लीचा रहिवासी असलेला सध्या बजरंगवाडी येथे राहणारा अब्दुल जमीर राऊफ अन्सारी (वय २७) असे या दुचाकीचोराचे नाव आहे. त्याने शहरातून पाच तर कळवण येथून एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, तो या सर्व चोरीच्या दुचाकींचा वापर करत होता.
मुंबई नाका पोलीस हद्दीत दाखल झालेल्या दोन दुचाकींच्या गुन्ह्यांचा शोध पोलिसांकडून सुरु होता. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणांची बारकाईने पाहणी केली होती. नेमके त्याचवेळी, सीसीटीव्हीमध्ये संशयित दुचाकीला चावी लावत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या आधारे पोलिसांनी संशयिताच्या घराजवळ सापळा रचत त्याला बजरंगवाडी येथून अटक केली. यावेळी त्या चोराच्या घराबाहेर उभ्या असलेल्या ६ दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहे.
सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम