बापरे, चक्क बिबटे नारळाच्या झाडावर चढले ! पाहा हा व्हिडियो…

0
28

सिन्नर – तुम्ही बिबट्यांना कधी झाडावर चढताना पाहिलंय, नाही. तर हे घडलंय सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे. तिथे चक्क दोन बिबट्या नारळाच्या झाडावर चढल्याचा व्हिडियो समोर आला आहे.

सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे सकाळच्या सुमारास दोन बिबटे गावातून भटकत असताना हे बिबटे थेट नारळाच्या झाडावर चढलेत. बिबट्यांचा हा थरार अनेक ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही दृश्ये तुम्ही एकदा पाहा !

दरम्यान, ह्या बिबट्यांची करामत अनेकांना जरी आनंददायी देणारी असली. तरी गावात आलेल्या बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये यावेळी भीतीचे वातावरणही पसरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिबटे वावरत असून बिबट्यांच्या ह्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण होत असून वनविभागाकडून ह्या बिबट्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here