नाशिक – शहर व जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक धरणक्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणाची पातळीतही वाढ झाल्यामुळे धरणातून आज रात्री ८ वाजेपासून पाण्याचा विसर्ग झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर धरणक्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असून पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने गंगापूर धरणातून रात्री ८ वाजता १००० क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने धरण परिसर व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम