मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण, प्रकृतीबाबत सविस्तर माहिती जाणुन घ्या 

0
16

मुंबई : मनसे पक्षप्रमुख (MNS Leader Raj Thackeray) राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया मुंबईतील लिलावती रूग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.

पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांना दिला होता. त्यानुसार ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

मुळात जूनच्या पहिल्याचं आठवड्यात त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया पार पडणार होती. मात्र, त्यांना (MNS Leader Raj Thackeray) कोरोनाची लागण झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय लांबणीवर गेला.

हे सुद्धा वाचा : 

राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली, अजूनही पक्षाचे आमदार मुंबईत दाखल नाही 

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून काल मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या (MNS Leader Raj Thackeray) महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आलं होतं.

मे महिन्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. तसेच ते मुंबईला परतले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं होतं.

येत्या ५ जून रोजी राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला होता.

मनसे राज ठाकरे यांचा १४ जून रोजी ५४ वा वाढदिवस होता. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी टाळल्या. ‘माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या (MNS Leader Raj Thackeray) वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही,’ असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना ऑडिओ क्लिपद्वारे दिला होता.

रेणू शर्मा, धनंजय मुंडें प्रकरणाला धक्कादायक वळण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here