Skip to content

राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली, अजूनही पक्षाचे आमदार मुंबईत दाखल नाही 


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आली आहे. सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असतानाच राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. कारण या अतितटीच्या निवडणुकीत मतदानाचा दिवस उजाडला असला तरी पक्षाचे तीन आमदार (NCP MLA) अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत.

हे तीन आमदार (NCP MLA) म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आहेत. राष्ट्रवादीचे हे तीन आमदार मुंबईत पोहोचले नसले तरी ते पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे सागितले जात आहे.

हे सुद्धा वाचा : 

रेणू शर्मा, धनंजय मुंडें प्रकरणाला धक्कादायक वळण

मतदानाची वेळ संपण्यापूर्वी हे तीनही आमदार मुंबईत पोहोचतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. अण्णा बनसोडे यांची प्रकृती तिर स्थिर नसल्या कारणास्तव अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत, तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत येऊ शकले नसल्याचे समजते. मात्र दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर (NCP MLA) आलेली नाही.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि (NCP MLA) नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार न मिळाल्याने पुढील काही तास राष्ट्रवादीसाठी चिंतेचे असणार आहेत.

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!