मुंबई : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वां हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले. कालच भाजप नेते गिरीश महाजन आणि भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनीही बविआचे आमदार हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली.
त्यानंतर आज खडसेंनी विरार येथे ठाकूरांची भेट घेतली. आता विधानपरिषदेत हितेंद्र ठाकूर हे कोणाला मतदान करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकांचे ढग गडद झाले आहेत.
उद्या म्हणजेच २० जूनला राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे. मतदानाला आता फक्त एक दिवस उरलाय त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
हे सुद्धा वाचा :
सैन्यदलातील सैन्य भरतीचा काॅन्ट्रॅक्टर कोण?, जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे १० व्या जागेसाठी मोठी चुरस असणार आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीची मतं महत्त्वाची ठरणार आहेत. त्यासाठी आज राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली.
हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरदेखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावं आणि आपल्या बाजूनं मतदान करावं यासाठी भाजप आणि मविआचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली आहे.
काय सांगता बीचुकले यांना खुद्द शरद पवार राष्ट्रपती करणार ? ; काय प्रकरण वाचा सविस्तर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम