Skip to content

नाशिक – पालकांनो मुलींची काळजी घ्या; एकाच दिवशी 6 मुलींच्या अपहरणाच्या तक्रारी दाखल


द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकमध्ये वाढलेल्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. आता एकाच दिवशी तब्बल 6 मुलींच्या अपहरणाच्या तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पहिली घटना नाशिकच्या शालिमार परिसरात, त्यानंतर दुसरी घटना भद्रकाली मधील पंचशील नगर परिसरात, तिसरी घटना रानाप्रताप चौकातून क्लासला गेलेली 15 वर्षीय मुलगी, चौथी घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीतील स्वामीनगर परिसर, पाचवी घटना लेखानगर आणि सहावी घटना भगूर परिसरात घडली आहे.

एकाच वेळी 6 अपहरणाच्या घटनांनी पालक वर्गात मोठी चिंता निर्माण केली आहे. नाशिक शहर व परिसरात वाढत्या अपहरणाच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. शहरात वाढती गुन्हेगारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.

क्लासला गेलेली मुलगी, शाळेत जाणारी मुलगी, आईसोबत बाजारात गेलेली मुलगी अशा अपहरणाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आता यामुळे आता मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. तर आता पालकांनी देखील आपल्या पाल्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!