आम्ही उद्धव ठाकरे सोबतच..!

0
28

 

 

जळगाव : शहरात आज शिवसेनेतर्फे रॅली काढण्यात येवून नेते जरी तुम्हाला सोडून गेले तरी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहो. तसेच एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) सर्व आमदार शिवसेनेत (Shiv Sena) परत येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जळगाव येथील शिवसेनेच्या कार्यालयापासून आज दुपारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

रॅलीत उध्दव ठाकरे यांची प्रतिमा कार्यकर्त्यांच्या हातात घेत शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत ही रॅली टॉवर चौकात गेली. त्या ठिकाणी रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here