Skip to content

बंडखोर आमदारांना प्रत्येकी 50 कोटी?; ऑडिओ क्लिपने खळबळ


मुंबई : राज्यात भूकंप घडवत खळबळ माजवली आहे. सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी फूट शिवसेनेत पडली आहे. यामागे हिंदुत्वाचे कारण दिले जात आहे. बाळासाहेबांचा विचारापासून सध्याची सेना लांब गेली आहे. सेनेचे हिंदुत्व संपले आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून आणि हे तीन पक्षाचे सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे भेटत नाहीत, दुसऱ्या पक्षाचे मंत्री आमची कामे होऊ देत नाहीत, अशी कारणे देत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला आहे. प्रत्यक्षात मात्र आता ही कारणे खोटी असल्याचे समोर येत आहे. या आमदारांच्या बंडखोरीमागे मोठे घबाड मिळाल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे,सध्या एका आमदाराची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे बंडखोरीसाठी आमदारांना मोठे घबाड मिळल्याचे दिसत आहे.

बंडखोर आमदारांना प्रत्येकी 50 कोटी; ऑडिओ क्लिपने खळबळ

काय आहे क्लिपमध्ये
‘आपल्याला ५० कोटी रुपये देत होते. पण पैशाला काय करायचे आहे. मला जीवन महत्वाचे. माझी सुखी राहण्याची इच्छा आहे’, असे हा आमदार कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हा आवाज चौकशी केली असता, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशमुख हे दोन दिवसापूर्वीच शिंदे गटातून सुटून परतले आहेत.

सुरतेहून एकनाथ शिंदे यांची साथ सोडत नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल प्रितम नावाच्या एका व्यक्तीने देशमुख यांना फोन करत अभिनंदन केल्याचे दिसत आहे. या व्यक्तीने देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले. त्यावेळी देशमुख हे आपल्याला 50 कोटी रूपये देत होते. पण पैशाला काय करायचंय असे हे बोलत असल्याचे दिसत आहे. नितीन देशमुख यांना 50 कोटी रुपये ज्या पद्धतीने देऊ केले, त्यांनी इतर बंडखोर आमदारांसाठी सुद्धा हा आकडा ऑफर केलेला असू शकतो, अशी चर्चा सध्या सुरु आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!