महाराष्ट्रातील २ हजार कोटींचे क्लस्टर; ५ हजार रोजगार निर्माण होणार

0
2

 

द पॉईंट नाऊ: महाराष्ट्रात होणार असणारे उद्योग प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात असताना केंद्र सरकारच्या वतीने आज महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक क्लस्टर देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) स्थापन करण्यासाठीची केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे ५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या अडीच वर्षांमध्ये हे क्लस्टर विकसित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टाटा एअरबस प्रकल्प,बल्क ड्रग पार्क व वेदांता फॉक्सकॉन या सारखे मोठे प्रकल्प राज्यातून गेल्याने शिंदे फडणवीस सरकारला लोकक्षोभाला व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रामधील रांजणगावला ईएमसी उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. (एमआयडीसी) म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हे क्लस्टर उभारण्यासाठीची मंजुरी आज दिली. त्यामुळे रांजणगाव एक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होणार असल्याचे. ते म्हणाले.

पुण्यातील रांजणगाव आता होणार इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित, इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचा काय फायदा?

२०१९- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात इलेक्ट्रॉनिक्सचे राष्ट्रीय धोरण (एनपीई) तयार केले होते.

२०१४- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात भारताची गुंतवणूक केवळ ११ लाख कोटी रुपये होती.

२०२२- ही गुंतवणूक ६ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तीन वर्षात ही गुंतवणूक २४ लाख कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

तामिळनाडू, नोएडा, तिरुपती व कर्नाटकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे जाळे विणले गेले. त्यात आता महाराष्ट्रही येत आहे.

कसा असेल हा क्लस्टर ?

२९७ एकरात उभा राहील

४९२ कोटी खर्च येणार

२०८ कोटींचा भार केंद्र सरकार उचलणार. उर्वरित रकमेचा हिस्सा एमआयडीसीचा राहील.

तरुणांना उद्योगाची संधी

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती ही भारतीय बनावटीची असावी, याकरिता केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून, या उद्देशाने पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअपला चालना व प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

सी-डॅक ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, येत्या काही वर्षात एक हजार कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरु करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे.

इलेक्ट्रॉनिक्सचीप, सेमीकंडक्टर याबरोबरच इतर पूरक उद्योगांवरही भर दिला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी उद्योग सुरू करावेत, यासाठी येत्या काही दिवसात पुण्यात रोड शो होणार असल्याचे ते म्हणाले.

उद्योग गेल्याने फरक पडत नाही

महाराष्ट्रातमधून एकापाठोपाठ एक उद्योग प्रकल्प जात असल्याने घाईघाईने या प्रकल्पाची घोषणा केली जात आहे का? असा प्रश्न विचारला असता राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हे युग स्पर्धेचे आहे. एखाद्या राज्यातून एखादा उद्योग प्रकल्प गेल्याने काही फरक पडत नाही.

बनावट कथानक: फडणवीस

आमच्या सरकारच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही. पण सध्यस्थितीत बनावट कथानकांची फॅक्टरी उघडून त्याद्वारे महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या हेतूने ‘मविआ’चे काही नेते आरोप करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here