द पॉईंट नाऊ ; नाशिक शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे कारवाई करण्यात येऊन, अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे.
नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात ही कारवाई करण्यात येऊन सुमारे 15 लाखांची अवैध मद्य जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
त्र्यंबक रोड वर असलेल्या गुरुकृपा हॉटेल परिसरात ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागा द्वारे करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील काही काळापासून अवैध धंद्यांचे पेव वाढले आहे. ज्यावर पोलीस यंत्रणा कारवाई करत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागा द्वारे बऱ्याच वेळा कारवाई करण्यात येऊन, अवैध रित्या आणले जाणारे अथवा विकले जाणारे संसाधन जप्त करण्यात आले आहेत.
त्र्यंबक रोड वर देखील, राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येऊन ही अवैध मद्य जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहिती अनुसार, एका वाहनाची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेले विदेशी मद्य जप्त करण्यात आले.
या मद्याच्या सोबतच व्हायटिंग पावडर देखील जप्त करण्यात आली आहे. 15 लाखाहून अधिकचे अवैध मद्य, 9 हजारांची व्हायटिंग पावडर असल्याचं सांगण्यात येत आहे.
कारवाई करण्यात आलेले वाहन, अवैध मद्य आणि व्हायटिंग पावडर असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हे अवैध मद्य दादर नगर हवेली मधील सिल्वास येथून आली असल्याचं सांगण्यात येतंय. तर याबाबतचा पुढील तपास केला जात आहे.
हे मद्य इतक्या मोठ्या प्रमाणावर नाशकात पोहोचलेच कसे? असा सवाल देखील यामुळे उपस्थित होतोय.
त्यामुळे मद्य प्राशन करणाऱ्यांनो सावधान व्हा!
असे अवैध आणि बंदी असलेले मद्य प्राशन केले. तर नाहक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कारण शासन उगीच कोणत्याही मद्यावर बंदी घालत नाही. अशा प्रकारचे मद्य आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
असे अवैध आणि बंदी घातलेले मद्य तुमच्या वाट्याला आले, तर नाहक तुमचं आरोग्य धोक्यात यायचं.
अवैध मद्याचा असा साठा सापडणे म्हणजे ही धोक्याची घंटा आहे.
जर असे अवैध मद्य शहरात दाखल होऊ शकते. तर ते तुमच्या वाट्याला देखील येऊ शकते.
म्हणून मद्य विकत घेतांना, देखील जरा विचार करून आणि विचारपूस करूनच घेत चला.
मद्य कोणत्याही प्रकारचे असो. ते आरोग्यास घातकच. पण जर घेतच असाल, तर काळजी घेऊन च घेत चला.
अन्यथा स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्या सारखं व्हायचं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]