द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या वर्षभरा पासून देशातील शेतकरी तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत होते. अखेर या आंदोलनाला यश मिळालं.
देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ मोठी घोषणा केली. आणि या घोषणेत मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्ध करण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी आंदोलनावर वर्षभर केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे शिवसेनेने सामनामधून हा अहंकाराचा पराभव आहे अशा शब्दात निशाणा साधला आहे.
‘शेतकरी लढत राहिले शहीद झाले व शेवटी जिंकले’ 13 राज्यातील पोटनिवडणूकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला त्यातून आलेलं हे शहाणपण आहे.
शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशान का फडकवले? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
तीन ही कृषि कायदे मागे घेन्यास अखेर केंद्र सरकारला भाग पडले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला.
पण आता ही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
शेतकरी ज्यावेळेस आंदोलनासाठी बसला होता त्या वेळेस शेतकऱ्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागला होता.
त्या वेळेस शेतकऱ्यांचं वीज पाणी बंद करण्यात आलं, दहशद निर्माण करण्यासाठी गुंडांचा टोळ्या पाठवण्यात आला, तरीही शेतकरी जागेचे हटले नाहीत.
त्या वरून शेतकऱ्यांवर दहशतवादी असल्याची टीका करून बदनाम करण्यात आलं.
५५० शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, दिड वर्ष ऊन, थंडी, वारा, पावसात ते रस्त्यावर लढत राहिले. आता हे शेतकरी माघार घेणार नाही.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले अशीही टीका करण्यात आली आहे.
हे आपण नक्की वाचायलाच हवं..
नाशिक शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे कारवाई करण्यात येऊन, अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.
नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात ही कारवाई करण्यात येऊन सुमारे 15 लाखांची अवैध दारू जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
त्र्यंबक रोड वर असलेल्या गुरुकृपा हॉटेल परिसरात ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागा द्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती अनुसार, एका वाहनाची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेले विदेशी मद्य जप्त करण्यात आले.
उर्वरित वृत्त वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
मद्यप्रेमींनो सावधान! तुम्ही बंदी असलेले मद्य तर पीत नाही ना?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम