सिन्नर येथे बस ट्रॅव्हल्सला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी टळली

0
16

दिवसेंदिवस राज्यात वाढत्या उष्णतेमुळे गाड्यांना पेट घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असाच प्रकार नाशिक पुणे महामार्गावर घडला शुक्रवारी रात्री ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले.

सिन्नर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी लक्झरी बसने पेट घेतला. टोलनाका पार करून बस मोहदरी घाटात पोहोचली. चालकाला
गाडीच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. गाडी थांबवली बस चालकाने प्रवाशांना बस मधून उतरून असे आव्हान केले आणि लांब उभे राहण्यास सांगितले यावेळी स्लीपर बस मध्ये तीस ते पस्तीस प्रवाशी राख होते.

बस घाटाच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना दूर पाठवण्यात आले. सर्व प्रवासी गाडीतून उतरले असता
हळूहळू बसने पेट घेण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. घाईने उतरताना प्रवाशांनी जीव वाचवण्याच्या भानात सामण गाडीतच सोडले. तर डिकीत असलेल सामान होण्यास वेळ मिटल्याने गाडीसह जळून खाक झाले.

बसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखिल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. . चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here