वाशी मार्केटमध्ये हापुसआंब्याची आवक; आंब्याच्या दरात घट

0
3

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षी आंबा उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना खूप मोठा फटका बसला होता. आता हापूस आंबा प्रेमींसाठी ही दिलासादायक बातमी. नवी मुंबईत एमपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे हापूस आंब्याचे दर घसरले आहे.आता हापूस आंबा सर्वसामान्य माणसाला परवडणारा आहे.

यंदा अवकाळी पावसासह बिघडलेल्या हवामानामुळे हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन कमी राहिले. एक महिना उशिरा पीक हाती आले आहे. वाशीमधील एपीएमसी मार्केट मध्ये सुमारे 90 हजार हापूस आंब्यांच्या पेट्या आल्या आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून वाशीत एक लाखापेक्षा अधिक पेट्या येण्यास सुरुवात झाली.

सध्या बाजारात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दीड ते दोन हजार रुपयांनी मिळणाऱ्या हापूस आंब्याचे दर आता 200 ते 500 रुपये डझनने मिळत आहे. हापूस आंब्याबरोबर, पायरी, बदामी आणि केसर आंब्यांची देखील आवक वाढली आहे.यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर बाजारात तेजी आली असून आंबा बागायतदार सुखावले आहेत.पिकलेल्या आंब्यांचा दरवळ सारीकडे पसरत असल्याने ग्राहक आपोआपच आंबे खरेदीसाठी येतात.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here