परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी

0
1

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. औरंगाबाद येथील भाषणानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. तर बीडमधील परळी कोर्टानेही राज ठाकरेंविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे २००८ मध्ये मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावरून दाखल गुन्ह्या प्रकरणात कोर्टाने हे वॉरंट बजावले आहे. तेव्हा झालेल्या आंदोलनांप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातीलच एका १४ वर्षे जुन्या प्रकरणात बीडमधील परळी येथील कोर्टाने राज ठाकरेंविरोधात हे अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

या संदर्भात कारवाईसाठी कोर्टाने मुंबई पोलिसांना पत्रही पाठवले आहे. जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे. राज ठाकरे हे १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे. काही दिवसांपूर्वी शिराळा येथील कोर्टाने राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी केल्यानंतर आता तेथूनही राज ठाकरेंवर करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here