Skip to content

लोणंद-फलटण येथे दोन गाड्याचा भीषण अपघात दोन ठार सहा जखमी


सातारा येथील लोणंद-फलटण रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये इंडिका कारमधील दोघेजण जागीच ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. भरदार रस्त्यावर अपघात झाल्याने झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली तर परिसरात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते.

भरधाव वेगाने येणारी इंडिंका कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने दुसर्‍या लेनमधून समोरून येणार्‍या तवेरा गाडीवर आदळली. या अपघातात तवेरामधील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. ही तवेरा देवदर्शन करून लोणंदच्या दिशेने जात होती.फलटण-लोणंद रोडवर सुरवडी नजीक जगताप वस्तीजवळ लोणंदकडून फलटणकडे निघालेली इंडिका कार आणि फलटण कडून लोणंद कडे निघालेली तवेरा वाहनांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर इतर सहा जण गंभीर जखमी आहेत.

या अपघातात शुभम केवटे हा अहमदनगर येथे राहत होता. सचिन ऊर्फ गोट्या भारत काळेल हा सण येथे राहतो. या दोघांचा मृत्यू झाला असून दैवत शामराव काळेल हे जखमी झाले आहेत. भीषण अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व पोलीस कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात घडल्याने रस्त्यावरती गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होताच पोलिसांनी प्रथम अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.

अपघातातील मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. इतरांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.या अपघाताची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!