Skip to content

संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिला चकवा; पोलीस जखमी


महाराष्ट्रात मशिदींच्या भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम काल संपला. यानंतर मनसेने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी भोंग्याविरोधात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडेही पोलिसांना सापडत नव्हते. . मात्र शिवतीर्थवर येताच देशपांडेनी पोलिसांना चकवा दिला.

राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना चालत जाण्याचा बहाणा केला . याच क्षणी देशपांडे यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे यांनी गाडीत बसून थेट पळ काढला. शिवतीर्थ समोरच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याने संबंधित महिला अधिकारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्तासाठी तैनात होत्या.

देशपांडे पळून जात असताना त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. संदीप देशपांडेहई याआधीच मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती.शिवतीर्थबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!