जळगाव- नाशिकमध्ये विमान सेवा होणार पुन्हा सुरू

0
19

नाशिक आणि जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेली ट्रुजेट कंपनीची विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. ट्रुजेटला आता भक्कम आर्थिक साथ मिळाली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस ही कंपनी सेवा सुरू करणार आहे. त्यात नाशिक आणि जळगावचाही समावेश आहे.

हैदराबाद येथील ट्रुजेट कंपनी कोरोनाच्या संकट काळात आर्थिक अडचणीत अडकली. त्यातच कंपनीच्या एका विमानाचे टायर कांडला विमानतळावर लँडिंग करतेवेळी फुटले होते. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी दिले होते. तसेच, हा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत सर्व उड्डाणे थांबविण्याचे निर्देश डीजीसीएने कंपनीला दिले होते.

कंपनीचे देशभरात एकूण ६५० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. त्यांचे पगारही थकले आहेत. कंपनीची विविध गुंतवणूकदारांशी चर्चा केली. काही परदेशी गुंतवणूकदारानी आता विन एअर या कंपनीसोबत ट्रुजेटची आर्थिक हातमिळवणी झाली आहे. कंपनीचे तब्बल २०० कोटी रुपयांमध्ये भागभांडवल खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कंपनीला हुरूप आल्याने जो कमीने काम सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अलायन्स एअर या कंपनीची नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली, नाशिक-पुणे आणि नाशिक-पुणे-बेळगाव या तर स्टार एअर या कंपनीची नाशिक ते बेळगाव ही विमानसेवा सुरू आहे

ट्रुजेट या कंपनीने केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत अर्ज केला. त्यानुसार कंपनीला अहमदाबाद-जळगाव, अहमदाबाद-नाशिक, अहमदाबाद-कांडला, अहमदाबाद-जैसलमेर, अहमदाबाद-पोरबंदर हे मार्ग प्राप्त झाले. त्यानुसार कंपनीने सेवा सुरू केल्या होत्या. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद आहेत. मात्र, आता विन एअरने ट्रुजेटचे भागभांडवल खरेदी केल्याने आता पुन्हा ही कंपनी सेवा सुरू करणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस या सर्व सेवा सुरू करण्यासाठी कंपनीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here