Skip to content

राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेचे नवे अध्यक्ष? पण समर्थकांमध्ये अस्वस्थता, कारण…..


अहमदनगर:     विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा आहे. आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, या बातमीमुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास ते सक्रीय राजकारणापासून दूर जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.

सत्ता नाट्यात विखे-पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर आता विखे-पाटील यांच्या बाबतीतही असा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने वखे-पाटील कार्यकर्त्यांमधूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सरकार न आल्याने विखे-पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तरीही त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला. पक्षाच्या उघड आणि गोपनीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे आता सरकार आल्यावर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. मात्र, आता मंत्रिपदाऐवजी त्यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत काहीही निर्णय झालेला नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!