Skip to content

शिंदे सरकारच्या अधिवेशन तारखांमध्ये बदल


मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार आले. या नव्या सरकारचे अधिवेशन उद्यापासून होणार होते. मात्र आता अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले.

उद्यापासून होणारे विधानसभेच्या अधिवेशनाचे विशेष सत्र आता ३ व ४ जुलैला होणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन तारखेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उद्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी अधिवेशन होणार आणि रविवारी अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. विधानसभेचे बोलावण्यात आलेले विशेष अधिवेशन एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी बोलावण्यात आलेल्या या सत्राच्या पहिल्या दिवशी फ्लोअर टेस्ट होणार होती.

दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोव्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गोव्यात पक्षातील महत्त्वाची बैठक घेत आहेत. गोव्यात सकाळी ११ वाजता ही बैठक सुरु झाली आहे. अशा स्थितीत आज सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!