Skip to content

येवला येथे चारचाकी झाडाला धडकल्याने घडला दुर्देवी अपघात; मृत्यू एक गंभीर जखमी


नाशिक शहरात येवला रोडवर मध्यरात्री एक दुर्देवी अपघातात घडला आहे. येवला रोडवर अनकवाडे शिवारात चारचाकी झाडावर जाऊन ठोकल्यान झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले.एकजण गंभीर जखमी झाला आहे.

येवला रोडवर मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात चारचाकी झाडावर जाऊन ठोकल्यान अक्षरशः चक्काचुर झाली आहे. अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर गाडीमधील पाचवा तरूण अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातातील तरूण अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आहेत. मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही पोलीस अधिकारी चौकशी करत आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!