Skip to content

महागाईचा फटका स्वयंपाकघरात, एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आता ही असेल नवीन किंमत


देशात आधीच महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाला आणखी एक झटका बसला आहे. महागाईने पुन्हा एकदा किचनला तडाखा दिला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. घरगुती एलपीजी सिलिंडरची वाढलेली किंमत आजपासून देशभरात लागू करण्यात आली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळली आहे. आता किंमत वाढल्यानंतर आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!