बोईसर पोलिसांचे कौतुक! आठ तासात बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला घातल्या बेड्या

0
2

बोईसर रेल्वे स्थानक परिसरातून आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मजूर कुटुंबातील ही मुलगी असुन आठ तासांत बोईसर लोहमार्ग पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. अपहरण करणाऱ्या तरुणाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

शुक्रवारी वर्षा डामोर तिच्या पतीसह बोईसर रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वेरुळावर मजूर काम करत होती. त्याच वेळी तिच्या आठ महिन्याच्या मुलीला बोईसर रेल्वे स्थानकावरील दोन पुलाखालील झोळीत झोपवले होते. दुपारच्या सुमारास मुलींची आईबरोबर काम करणाऱ्या महिलेने झोळीत बाळ नसल्याचे सांगितले.

माहिती कळताच वर्षाने टाहो फोडत बोईसर लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.पालघर पोलिस ठाण्याचे अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीने तपास केला.

मुरबे येथून कामासाठी आलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक व्यक्ती बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी त्या व्यक्तीसोबत असलेल्या बाळाचा फोटो काढून पोलिस ठाण्यात पाठवला. फोटोतील बाळाची ओळख तीचा आईने पटवली तातडीने पोलिसांनी जवान योगेश तरे याला संपर्क साधला आणि अतिरिक्त पोलिस बल पाठवले.

अटक केलेल्या आरोपीचे नाव किशोर गोट्या दगळे (वय ३०, रा. केळवा) असे आहे. आरोपी किशोर गोट्या दगळे याला बाळासह कुंभवली गावातून ताब्यात घेतले. पोलिस अधिकारी रणधीर यांच्या उपस्थितीत बाळाचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला.मोठा अनर्थ होताना टळला आहे.

 

 

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here