पुन्हा इथेनॉल तारणार साखर उद्योग; राज्यात नवीन ४० कारखान्यांत प्रकल्प, यंदाचे उद्दिष्ट ३०० कोटी लिटर

0
2

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

साखर उद्योगाच्या (Sugar Industry) इतिहासात प्रथमच प्रचंड वाढलेले राज्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र आणि त्यातून झालेले विक्रमी साखर उत्पादन यामुळे या उद्योगासमोर मोठे संकट उभे असतानाच इथेनॉलने (Ethanol) या उदयोगाला संजीवनीच मिळाली. त्याच्या विक्रीतून कारखान्यांना आठ हजार कोटी रूपये तातडीने मिळाल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देता आली. यामुळे पुढील वर्षी नवीन ४० सह राज्यात तब्बल १६० पेक्षा अधिक कारखान्यातून तीनशे कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उदिष्ट ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा हेच इंधन या उद्योगाचे संकटमोचक ठरण्याची चिन्हे आहेत. (new ethanol projects will be started in 40 factories in the state)

राज्यातील १९९ साखर कारखान्यांचा गळित हंगाम या आठवड्यात संपला. त्यामध्ये तब्बल १३२०.३१ लाख मे. टन उसाचे गाळप होवून १३७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांना सुमारे चाळीस हजार कोटी एफआरपी मिळाली. यामध्ये ३२ हजार कोटी साखर विक्रीतून तर आठ हजार कोटी रूपये इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना मिळाले. अतिरिक्त साखर उत्पादित झाल्यास त्याचे काय करायचे हा प्रश्न कारखान्यांसमोर होता. पण इथेनॉल निर्मितीने त्यांचा हा प्रश्न सोडवला आणि या इंधनाची कारखान्यांना नवसंजीवनी मिळाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here