Skip to content

जळगाव जिल्ह्यातील पाचही आमदार एकनाथ शिंदे सोबत


जळगाव : शिवसेनेतील बंडकखोर आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचही आमदारांचा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीच्या दिशेने निघाले असल्याचे आता समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोर्‍याचे किशोर पाटील आणि चोपड्याचे लता सोनवणे हे तीन आमदार पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पक्षासोबत उभे असल्याचे चित्र होते. आज सकाळी मात्र हे चित्र बदलले असून ते नॉट-रिचेबल झाले आहेत. ते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याची माहिती असून याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्यांनीनी दिले आहे. तर मुक्ताईनगरचे शिवसेना समर्थक आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईला निघाले असून ते तेथून गुवाहाटीत जाणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. या माध्यमातून शिवसेनेचा चार तर शिवसेना समर्थक एक असे पाचही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!