Skip to content

तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर ; पहा आजचे दर 


शुक्रवारी रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे.काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात उसळी घेताना दिसतात.

देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. यापूर्वी 6 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली होती. वास्तविक, 22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलची किंमत 14 वेळा वाढली आहे. गेल्या काही काळात पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी महागले आहे.

22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीची फेरी सुरूच आहे. इंधनाचे दर 137 दिवस स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!