Skip to content

खर्डेत पाझर तलाव दुरुस्ती व पुलाच्या कामाचे भुमीपूजन


खर्डे येथील दोडी पाझर तलाव दुरुस्ती व फरशीपुलाच्या कामाच्या भुमीपूजन प्रसंगी उपस्थित रायुकॉचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख ,पुरूषोत्तम कडलग, ,नुतन आहेर , सुनिल आहेर,शिवाजी जाधव आदी (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा : खर्डे येथील दोडी पाझर तलावाची दुरुस्ती व त्यावर फरशीपुलाच्या कामाचे भुमीपूजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या शुभहस्ते (दि ६) रोजी करण्यात आले.

वाखारी गटाच्या जि.प.सदस्या डॉ. नुतन आहेर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातुन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले . पावसाळ्यात दोडी पाझर तलाव भरल्यानंतर परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावा लागतो परिणामी गावाशी संपर्क तुटतो . ही होणारी कुचंबणा आता मार्गी लागणार आहे . यावर कायमस्वरूपी तोडगा काढून पाझर तलाव दुरुस्ती व फरशीपुल बांधणे हे काम मंजूर करून सदर विकासकामाचे भुमीपूजन झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर, जिल्हा परिषद सदस्या डॉ.नुतन आहेर, निफाड तालुकाध्यक्ष भुषण शिंदे, जयेश अहिरे, शाबाद सैय्यद, भाऊसाहेब मोरे, कारभारी जाधव, दौलत गांगुर्डे, शिवाजी जाधव, योगेश पवार, रामदास जाधव, मधुकर जाधव, बारकु जाधव, शंकर जाधव, राजाराम गांगुर्डे, वसंत पवार, हंसराज जाधव, संजय जाधव, गोरख जाधव, मुन्ना जाधव, प्रविण देवरे, तुषार जाधव, हरी जाधव, समाधान पवार, युवराज गांगुर्डे, वामन जाधव, सोमनाथ गांगुर्डे, बारकू गांगुर्डे,दीपक जाधव आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!