मुख्यमंत्र्यी उच्च न्यायालयात दाखल; मुख्य न्यायमूर्तींची घेणार भेट

0
1

राज्यात विविध घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. न्यायालत जाऊन मुख्य न्यायमुर्ती दिपंकर दत्ता यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायामूर्ती दिपंकर दत्ता आणि इतर न्यायमूर्तींच्या भेटीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायाधीशांच्या भेटीचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण तरीही ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. राज्य सरकार आणि कोर्ट यांच्यात समन्वय राहावा यासाठी काही काळाच्या अंतरात मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात भेटी होत असतात.

मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात कोर्टातील कर्मचारी आणि इतर समस्यांवर चर्चा होऊ शकते.राज्यातील सध्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २ दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.इतर ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शकता, आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावेळी निवडणूक आयोगाने पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याची भूमिका घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारसह आणि निवडणूक आयोग यांच्यातील अडचणीत वाढ झाली आहेत. राज्य सरकार आगामी महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सध्या चालू असलेल्या वादन मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा या वादावर तोडगा काढण्यासाठी देखील या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here