Skip to content

कु. आकांक्षा जयंत अहिरराव जयपुर स्थित ज्योति विद्यापीठ महिला विद्यालयाची “सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी” घोषित


देवळा प्रतिनिधी : जयपूर (राजस्थान) येथिल ज्योती विद्यापीठ महिला विद्यालयात BNYS ( बॕचलर इन नॕचरोपॕथी अँण्ड योगीक सायन्सेस) ह्या मेडिकल ग्रॕज्युएशनच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या देवळा येथिल कु. आकांक्षा जयंत अहिरराव हिला “सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी” म्हणून घोषित करण्यात आले ! कु. आकांक्षा ही देवळयाचे प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य डॉ. राम अहिरराव व डॉ. सौ. शोभना अहिरराव यांची नात आहे.

दि. २१ मार्च २०२२ रोजी विद्यापीठाच्या १४व्या स्थापना दिनानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ज्योति उत्सव’ या वार्षिक रंगारंग कार्यक्रमात विद्यापीठाने गौरविलेल्या ७ ‘वुमन आयकॉन’ (आदर्श महिला ), प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, विद्यापीठ स्टाफ व हजारो विद्यार्थिनींच्या उपस्थितीत कु. आकांक्षा जयंत अहिरराव हीस “Academic Excellence Award for Best Student of the Year” 2021-22 ह्या “सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी” पुरस्काराने विद्यापीठाच्या चेअरमन मा. सौ. मिथिलेश गर्ग मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.
आकांक्षाची चालू शैक्षणिक वर्षातील ( २०२१-२२ ) ही दुसरी गौरवास्पद कामगिरी असून या अगोदर डिसेंबर महिन्यात तिने विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदाची चुरशीची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून विद्यापीठाच्या इतिहासातील “सर्वात कमी वयाची अध्यक्ष” ( “स्टुडंट कौन्सिल प्रेसिडेंट” ) बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

चालू शैक्षणिक वर्षात आकांक्षाने लिहिलेले बरेच शैक्षणिक, योगा व निसर्गोपचारावरिल लेख प्रसिद्ध झाले असून, विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व अवांतर उपक्रमतील तिच्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल तिला हा बहुमुल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“चालू शैक्षणिक वर्षाच्या ह्या बहुमुल्य पुरस्काराने विद्यापीठाने मला – ( संपूर्ण विद्यापीठात एकाच विद्यार्थिनीला ) गौरवान्वीत केल्याबद्दल मी खुप आनंदी असून विद्यापीठ व स्टाफचे हृदयापासून आभारी आहे. ह्या पुरस्काराने माझी जबाबदारी अजून वाढली आहे” ह्या शब्दात आकांक्षाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आकांक्षा घेत असलेल्या परिश्रम व कष्टाची ही पावतीच असून विद्यापीठाने एका आदर्श विद्यार्थ्याला ह्या आदर्श पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आकांक्षाच्या कुटुंबियांनी ह्या सार्थ निवडीबद्दल विद्यापीठाचे आभार मानले.
ह्या कार्यक्रमाचे थेट (लाईव) प्रक्षेपण घरी देवळा येथे आकांक्षाचे कुटुंबिय बघत होतो.

“आकांक्षा हीस हा बहुमुल्य पुरस्कार जाहीर होताच आम्हास झालेल्या अत्यानंदाचे वर्णन शब्दांत होऊ शकत नाही – लेकीनं पुन्हा बाजी मारली व कुटुंबाचे, गावचे व जिल्ह्याचे नावलौकिक वाढवले. हा पुरस्कार आकांक्षा स्विकारत असतांना आम्हास आनंदाश्रू अनावर झाले होते व छाती गर्वाने फुगली होती” ह्या शब्दांत त्यांनी आपल्या ह्या आदर्श लेकीचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त करत गुरुंचे स्मरण करत परमेश्वराचे आभार मानले.

आकांक्षाच्या ह्या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!