Skip to content

एकनाथ शिंदेंवर भरवसा ठेऊन भाजपमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांची गोची


डोंबिवली:

एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच गाफील ठेवून अचानक केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या सगळ्याचा फटका महाविकास आघाडीसोबत ठाणे आणि डोंबिवली परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांनाही बसणार आहे. गेल्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने ठाणे आणि डोंबिवलीत जोरदार राजकारण सुरु आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून परस्परांचे कार्यकर्ते फोडले जात आहेत. यापैकी इतर पक्षांमधून शिवसेनेत येणारे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन पक्षात आले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे हेच वेगळा गट स्थापन करुन भाजसोबत गेल्यास आपलं काय होणार, असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेषत: भाजपमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांची आणखीनच गोची होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!