जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

0
9

नाशिक : राज्यात सद्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि महानगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाल्यानंतर राज्यात ग्रामपंचायतींचा धुरळा उडाला आहे. यानंतर लागलीच आता राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांमधील आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. ७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान याबाबतची कार्यवाही करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश दिले आहेत.

सर्वच राजकिय पक्ष या निर्णयाकडे आस लावून बसला आहे. या आदेशानुसार ७ जुलै रोजी आरक्षण सोडतीची सूचना वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी सर्व संवर्गाच्या महिलांसाठीचे आरक्षण सोडत घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे आदेशात नमूद आहे.

यानंतर १० मे, २०२२ रोजीच्या आदेशान्वये २५ जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार २७ जून, २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व इच्छुकांचे आता देव पाण्यात असून येणाऱ्या निवडणूकीत कोणाच्या गळ्यात विजयश्री पडते हे बघणे महत्वाचे असेल. आरक्षण सोडती नंतर थोड्याच दिवसांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here