Skip to content

राज्यभरात धुंवाधार पाऊस तर नाशकात पावसाच्या हलक्या सरी


नाशिक – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना तिकडे नाशिकमध्ये अजूनही संततधार पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे.

नाशिकमध्ये गेली अनेक दिवस पावसाच्या हलक्या सरी वाहत असून हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज केला होता. नाशकात सकाळी ऊन व जोरदार वारे तर संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान ढगाळ वातावरणात काही काळ पावसाच्या हलक्या सरी वाहतात, त्यामुळे शहरात पावसाचा लपंडाव सुरू आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र चांगला पाऊस पडत आहे. येवला वगळता उर्वरित जिल्ह्यांत पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात अनुक्रमे २८ मिमी व २३ मिमी इतकी झाली. पुढच्या काही दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!