Youth Day | स्वाध्याय परिवाराचा आज ‘युवा दिन’

0
73
Youth Day
Youth Day

वैभव पगार – पतिनिधी : दिंडोरी |  स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) हे हृदयस्थ झाल्यानंतर या कार्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या धनश्री तळवलकर (दीदी) यांचा आज १२ जुलै हा जन्मदिवस असून, हा दिवस संपूर्ण भारतातील व परदेशातील स्वाध्याय परिवार ‘युवा दिन’ म्हणून साजरा करतात. आजच्या युवकाला भक्तीबद्दल विचारले तर तो नाक मुरडतो. कारण तो पाहतो, समाजात भक्तीचा बाजार चालला आहे. त्याच युवकाची नजर जेव्हा दादांच्या स्वाध्याय कार्यावर जाते तेव्हा त्याला खरी भक्ती काय आहे ते कळते. या भक्तीमध्येसुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. कारण दीदींनी भक्तीचे खरे स्वरूप युवकांना समजावून सांगितले.

भक्ती केवळ पूजा, आरती व प्रसादात नाही. भगवंताचे नामस्मरण करून त्याची सेवा करणे म्हणजे भक्ती. मनुष्याला जीवनात विकास करावयाचा असेल तर भक्ती हे एक अमोघ शस्त्र आहे आणि ते सर्वांनी उचलले पाहिजे, असे दीदी म्हणतात. म्हणून दीदींच्या मार्गदर्शनाखाली युवक अगदी वेगळ्या प्रकारे गीता जयंती साजरी करतात. देशातील व बाहेरील युवक-युवती मग ते कुठल्याही जातीधर्माचे असोत, ते दिलेल्या विषयावर पाच मिनिटे आपल्या वाणीची कुशलता भगवंताच्या चरणी अर्पण करतात. ही स्पर्धा असली तरी बक्षिसाची हाव नाही. अहंपणाचा लवलेश नाही. त्याचप्रमाणे जन्माष्टमीला पथनाट्याद्वारे समाजप्रबोधनाचे काम हे युवक करतात.

Sandip Jagtap | संदीप जगताप यांच्या कवितांनी जिंकली अमेरिकेतील मराठी रसिकांची मने

दीदींनी महिलांनाही हळदी-कुंकू, अधिकमास आणि श्रावणमासात बुद्धिप्रामाण्यातून भक्ती याबाबतची समज दिली. त्यामुळे महिला अबला न राहता सबला बनल्या. कारण महिलांवरच कुटुंबाचा भार असतो. दीदींचा जन्मदिवस स्वाध्यायी वेगळ्या प्रकारे साजरा करतात. या दिवशी एक रोपटे लावून १०० दिवस या रोपट्याला लक्ष्मीनारायणाच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात येतो.आज काळ बदलला आहे. माणसाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. एकमेकांना भेटणे कठीण झाले आहे. माणूस भेटला तरी तो स्वार्थासाठी भेटतो. परंतु दादांनी निष्काम, निःस्वार्थी परिवार उभा केला. आज त्याचे संगोपन दीदी करीत आहेत. पू. दादांनी जे पंचरंगी क्रांतीचे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. युवक ही अशी शक्ती आहे. ती जे ठरवेन ते पूर्ण करून दाखवू शकते, म्हणून दीदींचा युवकांवर फार विश्वास आहे.

स्वाध्याय कार्याचा महामेरू तळागाळातील माणसांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, तसेच प.पु. दादांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा संकल्प सर्व युवकांनी करावा. हीच दिदींना जन्मदिवसाची भेट ठरेल ही अपेक्षा. – वैभव पगार, दिंडोरी ८६६८७१३३९६


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here