Skip to content

वयाच्या चाळिशीतही तुम्हाला तरुण दिसायचं ? मग हे ‘पाच’ पदार्थ टाळले पाहिजे


आजकाल कोणालाही तरुण व सुंदर दिसणे, फिट राहणे सर्वांनाच आवडते. मात्र वाढते वय हा आपला मुख्य अडथळा बनतो. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले, तरी आपण वाढत्या वयामुळे सुंदर दिसत नाही.

कारण अनेकांच्या वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर, शरीरात बदल दिसू लागतात. पण जर तुम्हाला वाढत्या वयातही तरुण दिसायचं असेल, तर सर्वात आधी हे पाच पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाकणे गरजेचे आहे. कारण हे पदार्थ टाळल्याने तुम्ही नुसते तंदुरुस्त दिसणार नाही, तर तरुणपण देखील टिकवता येईल. हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या :

रिफाइंड कार्बोहाइड्रेट (कर्बोदके)

रिफाइंड कार्बोहायड्रेट हे कोणत्याही वयात चांगले नसते. परंतु, चाळीशी गाठल्यानंतर ते पूर्णपणे बंद केले पाहिजे. कारण, यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढते. जेणेकरून तुमचे हार्मोनल आणि त्वचेची रचना बिघडवत असते. या कार्बोहायड्रेट्समध्ये पास्ता, डोनट्स, व्हाईट ब्रेड, कुकीज, पॅनकेक्स यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेले मांस)

प्राण्यांचे मांस व इतर प्रक्रिया केलेले मांस ह्यात चरबीचे प्रमाण जास्त असते, यामुळे तुमच्या पोटातील जळजळ वाढते. त्यासाठी जर तुम्हाला मांस खायचे असेल तर सेंद्रिय मांस खाणे आणि ते बनवताना जास्त प्रमाणात तेल आणि मसाले वापरायचे टाळावे.

फास्ट फूड (बाहेरचे खाद्यपदार्थ)

फास्ट फूड चवीला जरी कितीही चांगले लागले, तरी मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत. यामध्ये साखर, चरबीचे प्रमाण, नायट्रेट्स, सोडियम आणि इतर अनेक हानिकारक घटक असतात. जेणेकरून ते तुमच्या शरीराची रासायनिक रचना खराब करतात, त्यामुळे अशा पदार्थांपासून शक्यतो दूरच राहा.

पॅक केलेले फ्रूट ज्यूस

बाजारात मिळणारे कोणत्याही प्रकारचे पॅकेजबंद फळांचे ज्यूस हे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढवण्याव्यतिरिक्त कोणतेही काम करत नाही. त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात फायबर देखील नसतात. म्हणून हे ज्यूस फक्त मधुमेहाचा धोका वाढवते.

दारूचे सेवन करणे टाळा 

दारू व इतर अल्कोहोल असलेले पेयाचे सेवन सर्वच वयोगटासाठी घातकच आहे. मात्र, वयाच्या चाळीशीनंतर अश्या पेयांचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. कारण या सेवनामुळे वाढत्या वयाबरोबर शरीर त्याचे योग्यप्रकारे चयापचय करू शकत नाही आणि यकृत देखील ते योग्यरित्या पचवू शकत नाही.

सूचना : या विषयीची सर्व बाबी केवळ माहितीसाठी देत असून यावर आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे याबाबतचा अधिकच सल्ला डॉक्टर, डाएटेशियन यांच्याकडून घ्यावा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!